शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तीन महिन्यानंतरही २० टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचीत, महपालिका प्राथमिक शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:21 IST

महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुरु होऊन किमान तीन महिने उलटले तरीही अद्याप २० टक्के विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचीत आहेत. महापालिकेच्या ५९ प्राथमिक शाळापैकी सुमारे ६४०२ विद्यार्थ्यांना दुहेरी गणवेशाचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्दे ६४०२ विद्यार्थ्यांना दुहेरी गणवेशाचा लाभशासनाच्या समग्र शिक्षा अभियानातून सुमारे ३९ लाखाचे अनुदान महापालिकेस प्राप्त

कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुरु होऊन किमान तीन महिने उलटले तरीही अद्याप २० टक्के विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचीत आहेत. महापालिकेच्या ५९ प्राथमिक शाळापैकी सुमारे ६४०२ विद्यार्थ्यांना दुहेरी गणवेशाचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे वंचीत सुमारे ३१९८ विद्याथ्यांच्या गणवेशासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून तरतूद करण्याची कार्यवाही सुरु आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना यंदाच्यावर्षी दोन गणवेश देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ५८ लाख रुपयांची तरतूद केलीं आहे. त्यामध्ये शासनाच्या समग्र शिक्षा अभियानातून सुमारे ३९ लाखाचे अनुदान महापालिकेस प्राप्त झाले होते. या अभियानातून शहरातील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थीनी, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी, दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश मिळतात.

दरम्यान, हे अनुदान त्या-त्या शाळांना देऊन तीन महिने उलटले, जूनपासून सर्व शाळाही सुरु झाल्या तरीही काही शाळातील विद्यार्थ्यांच्या अंगावर गणवेश झळकले तर अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मंजूर होऊनही तो अद्याप त्यांच्या अंगावर चढलेला नाही. याशिवाय शासकिय नियमानुसार या गणवेशापासून सुमारे ३१९८ मुले वंचीत राहीली आहेत.महिला व बालकल्याण’तर्फे वंंचीतासाठी तरतूदसर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा या हेतूने वंचीत विद्यार्थ्यांच्या एका गणवेशासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने तरतूद केली आहे.पण त्यासाठी समितीच्या बैठकीतील मंजूरीची प्रतिक्षा लागून राहीली आहे.तीन शाळांचे अहवाल अद्याप बाकीमहापालिकेच्या ५९ शाळांना हे अनुदान विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. शाळेतील गणवेशाबाबतची पूर्तता केल्याबद्दलची परिस्थिती त्या-त्या शाळेतील व्यवस्थापन समितीने समग्र शिक्षा अभियानकडे पाठवायची आहे. त्यासाठी १२ सप्टेंबरपर्यत अंतीम मुदत होती. पण मुदतीत फक्त ४० शाळांचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले. अहवाल देण्याबाबत नोटीस बजावण्याचा धाक दाखविल्यानंतर गेल्या पाच दिवसात आणखी १६ शाळांनी अहवाल पाठविले आहे. पण अद्याप तीन शाळांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी